नऊ राज्याच्या इलेक्शन पर्वाला सुरवात…

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षी मध्य प्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालँड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या ९ राज्यांपैकी ६ राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. या निवडणुकांना २०२४ पूर्वीची सेमीफायनल म्हणता येईल. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड निवडणुकीची २७ फ्रेब्रुवारीला तर त्रिपुरा राज्याची निवडणूक १६ फ्रेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ह्या वर्षाला ‘निवडणुकांचे पर्व’ म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.

ईशान्य भारतातल्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यापैकी नागालँड मध्ये नेशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीचे नेफियू रियो हे मुख्यमंत्री आहेत. येथे येणाऱ्या निवडणुकीत भाजपला कस लावला लागणार आहे. येथे पहिल्या पेक्षा जास्त परस्थिती सुधारण्याचे भाजप समोर आव्हान असणार आहे. येथे कॉँग्रेसला काही संधी मिळतेय का नाही, हे पहावे लागणार आहे. नागालँड मध्ये भाजपला १२ जागा मिळालेल्या आहेत. भाजपचा मानस हा कोणत्याही स्थितीत नागालँड मध्ये सत्ता स्थापित करण्याचा असेल त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते की नाही हे बघावे लागणार आहे.तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तर तेलंगणामध्ये भारतीय राष्ट्र समितीचे (पूर्वीचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती) सरकार आहे.याशिवाय राजस्थानमध्ये काँग्रेसची स्थितीही कमकुवत आहे. येथे काँग्रेसमधील भांडणाचा फायदा पक्षाला होऊ शकतो.

मेघालय येथे नॅशनल पीपल पार्टीचे प्रमुख कॉनरॅड संगमा हे मुख्यमंत्री आहेत. हे राज्य भाजपसाठी थोडे कठीण समजले जाते. येथे भाजपच्या वाट्याला २ जागा आहेत. मेघालय मध्ये भाजप काय करिश्मा दाखवते, हे बघावे लागणार आहे. इथं भाजपकडे केवळ दोन जागा आहे. त्यामुळे इथं जागा वाढवण्यासाठी भाजप शर्तीचे प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहे. तर त्रिपुरा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे कारण इथ साम्यवादयांची कॉम्रेड मंडीळीची वर्षानुवर्षांची सत्ता उलथवून टाकून भाजपने आपली सत्ता मिळवली आहे. ईशान्य भारतात भाजपला पहिले यश फारसे मिळत नव्हते. अशातच त्रिपुराने दिलेले यश भाजपसाठी अंत्यत महत्वाचे ठरले होते. त्रिपुरा मध्ये भाजप सत्ताधारी आहे. भारताची दक्षिण विजयाची स्वारी जशी कर्नाटक मधून सुरु झाली तशीच पूर्वोत्तर भारताच्या विजयाची स्वारी ही त्रिपुरा मधून सुरु झाली. सध्यास्थितीत त्रिपुरात भाजप एक नंबरचा पक्ष आहे. आहे.६ राज्यांत भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. काँग्रेस दोन राज्यात तर एक राज्य तेलंगणा बीआरएस (टीआरएस) सोबत आहे. तेलंगणात भाजप खूप प्रयत्न करत आहे.

भाजपचा मेगा प्लॅन तयार असला तरी पुढे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टिकोनातून काही राज्ये आपल्या हातून जाऊ नयेत, या काळजीपोटी योग्य प्लॅनने ते निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे चित्र दिसते. तर दुसरीकडे काँग्रेसची या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही रणनीती आखताना दिसत नाही. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे. याशिवाय राजस्थानमध्ये काँग्रेसची स्थितीही कमकुवत आहे. येथे सचिन पायलट हे काँग्रेस मध्ये नाराज आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंजक होणार असल्याचे चित्र आहे. कॉँग्रेसची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे निष्ठावंताना आणि तरुणांना डालवून प्रस्तापित वर्गाला वेळोवेळी संधी देणारा पक्ष अशी त्यांची प्रतिमा जनमानसात तयार झालेली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, हार्दिक पटेल, सत्यचित तांबे, सचिन पायलट ह्या तरुण चेहऱ्यांना काँग्रेसने नाराज केले आहे. त्यातील काही कॉँग्रेस सोडून गेले आहेत, काही कॉँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कॉँग्रेसने कितीही चिंतन बैठका घेतल्या आणि त्यातून काही धडा घेतला नाही तर त्या बैठकांचा काहीही अर्थ उरणार नाही.