सी. व्होटरच्या सर्व्हेनुसार जर आज महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला एकूण 34 जागा मिळू शकतात. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, यावर आ. रवी राणा यांनी टीकास्त्र सोडले आहे. सी-व्होटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.
सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्वेक्षण केले. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा दावा यात करण्यात आला आहे. यावर अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. सी व्होटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे. जनतेची दिशाभूल करणारा हा सर्वे आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा शिंदे गट व भाजपला मिळतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
‘बाळासाहेबांच्या विचाराची सेना ही भाजपसोबत आहे. तसंच उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष महाराष्ट्रात थांबला होता. आता महाराष्ट्र धावत आहे, त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे, येणारा काळ हा भाजपा शिंदे गटाचा आहे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली
