छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न म्हणणारे नपुंसक, आमदार राजा सिंग यांची टीका

मुंबई : काही नपुंसक नेते छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली ते धर्मसाठी लढले नाहीत असे म्हणतात. त्या नपुंसक नेत्यांना सांगू इच्छितो की, एक वेळा त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असता तर त्यांनी ते शब्द वापरले नसते, अशी टीका तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनी केली आहे.

मुंबईत शिवाजी पार्क येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राजा सिंह बोलत होते. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुण्यामध्ये झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा मध्येही आमदार राजा सिंह यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्यांवर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.