राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. राज्यातील पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीत केंद्रस्थानी आला आहे. या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु दुसरीकडे भाजपने या ठिकाणी उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे हा सर्व भाजपचा खेळ आहे. असे काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. परंतु अद्यापही भाजप तांबे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले नाही. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.आज माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे.
खासदार सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचे स्टेटस ठेवले आहे. विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या स्टेटसवर विजयी भवं असं लिहिलं आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यामुळे पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसह विखे पाटलांच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे झळकले आहे. खासदार सुजय विखे यांनी रात्रीतून चमत्कार घडणार असं वक्तव्य केलं होतं. आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप सत्यजीत तांबेंच्या पाठीशी उभा राहिल्याचं स्पष्ट होतंय.
