नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढची सुनावणी कधी हाेणार याबाबतही न्यायालयाकडून
स्पष्ट करण्यात आलेले नाही. सर्वाेच्च न्यायालयात आज चौथ्या क्रमांकावर हे प्रकरण होते. चार वाजता कोर्टाचं कामकाज संपते. दहा मिनिटे आधी तिसऱ्या क्रमांकाचं प्रकरण संपवलं आणि कोर्ट थेट उठले.
आता पुढची सुनावणी कधी होणार याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार हाेती. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग चाैथ्यांदा लांबणीवर पडली आहे.
