काँग्रेसच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळे अदानी उद्योग समूहाविरुध्द टीका सुरू केली आहे. मात्र काँग्रेस सोबत असलेल्या महाविकास आघाडीचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी गौतम अदानी कमालीचा कष्टाळू असून शून्यातून आपलं साम्राज्य केले उभे असे कौतुक केले होते.शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात अदानी यांचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, असाच एक आवर्जून उल्लेख करावा लागेल तो गौतम अदानी या नावाचा. अलीकडे खूप मोठ्या बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू शून्यातून त्याने आपलं साम्राज्य उभ केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्याच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता.पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्वकांक्षा होती. या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईकडे गुजरात मधील मुद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुद्रा वाळवंटी भागातील बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तूस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एकर जमिनीवरच हे बंदर देशातील सर्वात मोठे आणि अद्ययावत बंदर आहे.
गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, “वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा” एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो उद्योग येतील पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.” त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मितीचया क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.

शरद पवार यांच्या पुस्तकातील या उताऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे.त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदानी यांच्याविषयी टीकेचा एक शब्दही काढला जात नाही असे म्हटले जात आहे.
