काही लोकांनी हात वर केले पण संकटात आम्ही संजय राठोडांच्या पाठीशी उभे राहिलो – मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदे

मंत्री संजय राठोड यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र बंजारा समाज आणि संजय राठोड यांच्या पाठीशी उभा राहिलो अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे पोहरादेवी येथे सांगितले.उमरी व पोहरादेवी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले आनंदात सर्व सोबत येतात संकटात कोणी नसतो.

मात्र अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे – घेणे असा विचार आम्ही केला नाही तो आमचा आहे आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला आहे. बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिला आहे. महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार आहे मुंबईत बंजारा समाज भवन उभा करणारे संजय राठोड नेहमी समाजाच्या प्रगतीसाठी धडपडत असता