पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी; शरद पवारांचा पुन्हा यू टर्न

पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती असा गौप्य्स्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना माहिती होती असा दावा केला होता. हा दावा शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मेनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले या विषयावर अजित पवारांनी बोलायची गरज काय?पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?

शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत घेतलेले यू टर्न अजित पवार यांना वाचविण्यासाठी असल्याचेही मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वक्तव्य केल्यावर अजित पवार यांच्याबाबत महाविकास आघाडीमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अजित पवारच आमदारांच्या पाठिंब्याचे पात्र घेऊन आले होते असा दावा केला होता. पवार म्हणाले, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका महाविकास आघाडीसाठी महत्वाच्या आहेत. नाव, चिन्ह शिवसेनेने गमावले आहे. विरोधकांवर हल्ले होत आहेत. पक्ष कमकुवत होत असताना खचून न जाता सगळे एकत्र आहेत हे दाखवण्याची संधी मिळाली आहे.