संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
संजय राऊत यांनी धमकी मिळाल्याचे पत्र मु़ंबई पोलीस आयुक्तांना दिले. राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यासंदर्भात पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पत्र लिहून डिवचले आहे. तसेच त्यांनी राऊत यांना मेडिटेशनचा सल्ला दिला आहे. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावलं आहे. म्हणून शिवसेना हातून गेली. काळजीपोटी हा पत्रप्रपंच केला. पटलं तर घ्या. असे संदिप देशपांडे म्हणाले.
‘आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. ‘आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत,असे देशपांडे म्हणाले.
