पेगॅसस माेबाईलमध्ये नाही तर राहुल गांधींच्या डोक्यात आहे. ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत असा हल्लाबाेल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज यूनिवर्सिटीमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भाजपा संतप्त झाली आहे. राहुल गांधींची विधानं खोटी आणि भारताची बदनामी करणारी असल्याचे सांगताना ठाकूर म्हणाले, हे पेगॅसस कुठं दुसरीकडे नाही तर राहुल गांधी यांच्या डोक्यात बसले आहे. काय मजबूरी होती की राहुल गांधी यांनी आपला मोबाईल पेगॅसस प्रकरणात तपासासाठी जमा नव्हता केला. जे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये असे काय हाेते जे त्यांना आतापर्यंत लपवावं लागत आहे. त्यांनी आणि अन्य नेत्यांनी तपासणीसाठी आपले मोबाईल जमा का केले नाहीत?
अनुराग ठाकूर म्हणाले जगभरात मोदीच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील नेतृत्व म्हटलं जात आहे. राहुल गांधींनी कुणाचं नाहीतर किमान इटलीच्या पंतप्रधानांचं तरी ऐकायला हवं होतं. इटलीच्या पंतप्रधानांनी सांगितलं हे की जगभरात मोदींनी जे प्रेम मिळत आहे, ज्याप्रकारे ते जगाचे लोकप्रिय नेते म्हणून पुढे येत आहेत. ते आज एक मोठे नेते आहेत. हे कदाचित राहुल गांधी आणि काँग्रेसला मान्य करता येत नाही. तीन राज्यांत झालेल्या निवडणुकांत काॅंग्रेसचा सुफडासाफ झाला आहे त्यामुळे ते आता परदेशात जाऊन रडत आहेत.
