उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा!

सांगली : सध्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांची अवस्था “म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशी झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. पत्रकारांशी बाेलताना पडळकर म्हणाले की, राऊत हा फार वेडा झालेला माणूस आहे. शिवसेनेची पूर्णपणे राख रांगोळी झाली, आता तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कुठेतरी थांबायला हवं. राऊत यांनी शरद पवारांच्या हातात हात घालून शिवसेना पूर्ण संपवली, तरी देखील राऊत शांत बसायला तयार नाहीत. विधिमंडळाला चोरमंडळ आणि निवडणूक आयोगाला शिव्या घालण्यापर्यंत राऊत बडबड करत असतात. त्यामुळे संजय राऊत यांना मिरजेतील कृपामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे.

पवारांसह विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावरून बोलताना पडळकर म्हणाले की, शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या उलट करतात आणि त्यांच्या कृतीतून ते दिसून येईल. हे लोक आता एकमेकांना सांभाळून घेत आहेत. राज्यातलं राहील बाजूला आणि हे लोक आता देशातली भाषा बोलायला लागलेली आहेत.