पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कल्पकतेने राबविलेल्या योजनांमुळे गृहबांधणी क्षेत्रात फील गुड वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. 32 हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य पार करत आतापर्यंत 34 हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतात नोंदणी व मुद्रांक शुल्कच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र शिंदे फडणवीस सरकारने कल्पकतेने अनेक योजना राबविल्या. या विभागात पारदर्शकता आणली.यंदा महसूल विभागाने ३२ हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ते पार करत आतापर्यंत ३४ हजार कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. महिनाभरात महसुलाचा हा टप्पा ४० हजार कोटी रुपयांपर्यंत धडक मारेल, असे संकेत मुद्रांक विभागाने दिले आहेत. त्यामुळे महसूल मिळवून देण्यात दुसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणून ओळख असलेला महसूल विभाग शासनाच्या विकासनिधीत यंदा दमदार हातभार लागणार आहे.
चालू वर्षात २२ लाख ६३ हजार ९५८ दस्त नोंदणीतून ३४ हजार कोटींचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला. आणखी महिनाभरात मोठया प्रमाणात दस्त नोंदणी अपेक्षित असल्याने हा टप्पा ४० हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध शहरांत तसेच विस्तारित भागांत मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढत आहेत. ग्रामीण नागरिकांच्या स्थलांतरामुळे नागरीकरण वाढत आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढून नोंदणी व मुद्रांक विभागाकडे महसूल जमा होण्याचे प्रमाण वाढत आहे. नवीन- जुनी घरे, जमीन, दुकाने आदीची खरेदी-विक्री, रेडिरेकनर, करार नोंदणी, भाडेकरार आदी गोष्टींच्या माध्यमातून महसूल विभागाकडे कर जमा होत असतो.
घरबांधणी क्षेत्रात तेजी राहिल्याने महसुलाचे प्रमाण वाढले. पुणे, मुंबई, नाशिक, रायगड आदी भागांत प्रामुख्याने व्यवहार अधिक प्रमाणात झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुंद्राक विभागाचे लक्ष्य ३२ हजार कोटी रुपये महसूल जमा करण्याचे होते. ते पार झाल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे महासंचालक श्रवण हर्डीकर यांनी सांगितले.
