आज जागतिक महिला दिन : या दिवसाचा इतिहास काय? यंदाच्या महिला दिनाची थीम काय? सविस्तरपणे जाणून घेऊयात

जागतिक महिला दिनाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी माध्यमांमधून तर कधी आपल्या आसपासच्या लोकांच्या संभाषणातून. पण हा दिवस नक्की काय आहे? हा साजरा करायचा असतो की यादिवशी आंदोलन करायचं असतं. हा जागतिक पुरुष दिनासारखाच असतो का?

जवळपास एका शतकाहून जास्त काळ ८ मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. पण का?

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो.भारतातील महिलांनी प्राप्त केलेल्या यश किर्तीचा आढावा घेऊन त्यांच्या कामगिरीचे त्यांना पुरस्कार वगैरे देऊन कौतुक केले जाते. देशासाठी योगदान देणाऱ्या महिला स्वातंत्र्य सेनानींची त्यांच्या बलिदानाची आठवण केली जाते.देशाचे नाव मोठे करणार्या महिलांना स्मरण केले जाते.

स्त्रियांच्या या कृतीमुळे व स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा जो ठराव क्लारा ने मांडला, तो पास झाला. बल्गेरिया आणि रोमानिया या देशांमध्ये हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो

आपल्या भारत देशात मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ मध्ये पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला.

यंदाच्या महिला दिनाची थीम काय?
2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. या थीमचा उद्देश आहे की जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्याचा यथोचित सन्मान करावा.

यंदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेही शोधण्याचा प्रयत्न असेल.

संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार इंटरनेटचा अॅक्सेस नसल्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशांच्या जीडीपीला 2025 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलर्सचा फटका बसू शकतो.

‘महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं’ तसंच ‘महिलांबद्दल असलेल्या जुन्या विचारधारांना तोडणं, त्यांना कमी लेखलं जातं याकडे लक्ष वेधणं, आणि त्यांचा सर्वांगिण विकास होईल हे पाहाणं’ अशाही काही थीम यंदा साजऱ्या केल्या जातील.