संजय राऊत म्हणतात, राष्ट्रवादी पडतेय कमी

मुंबई : नागालँड मधून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणित सरकारला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चांगलीच कोंडी झाली आहे. विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकता यावी त्यामुळे अशाप्रकारे निर्णय घेतले जातात. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रवादी कांग्रेस कमी पडत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीची आज बैठक आहे, त्यावर चर्चेत नक्की हा विषय देखील येईल, असा सूचक इशाराही राऊत यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या कृत्यावर मखलाशी करताना राऊत म्हणाले, भाजपनं नागालॅंडमध्ये सत्ता स्थापन केलेली नाही. नागालॅंड हे सीमावर्ती राज्य आहे संवेदनशील राज्य आहे. रिओ पार्टीबरोबर भाजपची युती होती. त्यात भाजपला १०-१२ जागा मिळाल्या आहेत. सर्वांनी एकत्रित येत सरकार बनवलं हे खरंय. असा प्रयोग तिथे आधी देखील झाला आहे कारण राज्याची ती गरज आहे. सुरक्षाविषयक परिस्थिती काश्मीरपेक्षाही तिथली गंभीर आहे, भाजप तिथल्या सरकारमध्ये सामील झालंय.

राऊत म्हणाले, ज्यापद्धतीनं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, जो राज्याच्या हितासाठी, हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करत तोडला हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. राज्याची जनताच आता ठरवेल त्यांना माफ करायचं की नाही मात्र, महाराष्ट्रातील जनता ही वेदना विसरणार नाही. तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा घाव आहे. हा घाव शिवसेना कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही. राजकारणात मतभेद होत असतात पण तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडता, तोडता आणि चोर लफंग्यांच्या हातात ठेवता कोण तुम्हाला माफ करेल