मुंबई : तथाकथित पुरोगाम्यांना कायम आपल्या कच्छपि ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशस्वी ठरले. मात्र नागालँड मध्ये भाजप प्रणित सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने पुरोगामीही पवारांवर तुटून पडले आहे.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर पुरोगाम्याना गुदगुल्या झाल्या. भाजप विरोधी आघाडीचे चाणक्य म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ सरकारला पाठिंबा दिला आणि सगळे पुरोगामी पवारांवर तुटून पडले आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि मिम्सच्या माध्यमातून पवारांवर टीका केली जात आहे.
सोशल मीडियावर एकाने म्हटले आहे, मला पुरणपोळी आवडते, पण आतील पुरण नाही! तर राज्यातील शिवसेना संघर्षाचा संदर्भ देत नागालॅंडमधील सात आमदारांनी वेगळा गट स्थापन करत पक्षच ताब्यात घेऊ नये म्हणून पवार साहेबांनी नाईलाजाने भाजपसोबत जायला संमती दिलीय अशी टीका होत आहे.
नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, भाजप सरकारला नव्हे, असा नवा सिद्धांत शरद पवार यांनी मांडल्यामुळे, यापुढे ‘मोदी यांना समर्थन, भाजपला नव्हे’ असेही म्हणता येऊ शकेल किंवा महाराष्ट्रात शिंदे यांना पाठिंबा, भाजपला किंवा फडणवीस यांना नव्हे, अशीही मांडणी करता येईल, असा शालजोडीतला एका ज्येष्ठ पत्रकाराने मारला आहे.
नागालॅंडच्या निवडणूकीतली समीकरणे इतर राज्यातही होऊ शकतात, असा याचा अर्थ आहे. एका अर्थाने शरद पवार त्यांचा राजकीय गट, जो त्यांच्या पक्षापेक्षाही शेकडो पट मोठा आहे, तो मजबूत करत आहेत. शरद पवार मोठं काही तरी रचत आहेत. लेट्स वेट ॲंड वाॅच, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
नागालॅंडमध्ये विरोधी पक्षच नसावा, या व्यापक देशहिताचा विचार करून भाजपला पाठिंबा दिला, म्हणून लोक थोडे दिवस राष्ट्रवादीला ट्रोल करतील. चालायचं, राजकारण आहे, असे म्हणून पवारांना पाठिंबाही दिला जात आहे.
विविध कॅटेगरीत यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार विजेते पोरं भूमिका म्हणून, साधा निषेध म्हणून हा जाहीर झालेला पुरस्कार काय परत करणार नाहीत, असे म्हणत पुरोगाम्यांच्या दुटप्पी वर्तनावर एकाने कोरडे ओढले आहेत.
नागालँड मध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा एनडीपीच्या मुख्यमंत्र्याला आहे, भाजपला नाही.
या धर्तीवर (लॉजिक) महाराष्ट्रात मविआ सरकार असताना एनसीपीचा पाठिंबा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना होता, काँग्रेसला नव्हता (शिवसेना -काँग्रेस- एनसीपी आघाडी) असं वक्तव्य आलं तर आश्चर्य नको, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
तू पुरोगामी होने का नाटक ना कर अय दोस्त।
हमने देखा है तुझे नागालॅंड में ‘उनके’ साथ सरकार बनाते हुवे, या मिममधून एकाने पवारांच्या राजकारणाचे वर्णनच केले आहे.
