माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही – राज ठाकरे

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊ देणार नाही, असं सांगतानाच ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल मग सगळ्यांना कळेल, असा इशारा राज ठाकरे यांनी संबंधितांना दिला. तसेच कोणतीही सत्ता नसताना तुमची उर्जा पक्षाला पुढे घेऊन जातीये, अशा शब्दात मनसे नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवर राज ठाकरेंनी कौतुकाची थाप मारली.

तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले मराठी चित्रपटाला हक्काचे चित्रपटगृहे आम्ही मिळून दिले. आमच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात मोबाईल वर मराठी ऐकू येऊ लागले, दुकानावरच्या पाट्या मराठीत झाल्या, परंतु महाराष्ट्रात राहून देखील हे करावं लागत यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं कोणतं नाही.पुढे राज ठाकरे यांनी महाराष्ट नवनिर्माण सेना पक्षाला नाव ठेवणाऱ्याना म्हणाले की ते तेरा आमदार काय सोरटवर निवडुन आले नव्हते ते आम्ही आमच्या बळावर निवडून आणले होते. पक्षाचं काय सांगता ज्या पक्षाने 70 वर्ष देशावर राज्य केले त्या पक्षाची आज काय परिस्थिती आहे हे सांगण्याची गरज नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.