छत्रपती संभाजीनगर: औरंगजेबाने इथल्या मातीवर, माता भगिनींवर अत्याचार केले. तलवारीच्या धाकावर धर्मांतरण केले. जुलमी राजवट चालवली. मंदिर फोडले. परकीय आक्रमक करणारा औरंगजेब या देशाची संतान असू शकत नाही, असा घणाघात त्यांनी केला. या देशाचे खरे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहेत, असा हल्लाबोल भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर
असे करण्यात आल्यावर एमआयएम खासदार यांनी उपोषण सुरू केले. जलील यांच्यावर टीका करताना कुळकर्णी म्हणाले की, या देशात आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेब की छत्रपती संभाजी महाराज असा विषय येईल. तेव्हा या देशातील मातीचा कणकण छत्रपती संभाजी महाराज यांचेच नाव घेईल. एमआयएम आणि इम्तियाज जलील यांनी अधिक ‘जलील’ होण्याआधी आपले उपोषण मागे घ्यावे,
