जलयुक्त शिवार – २’ सुरू करणार, पहिल्या टप्प्यात राज्यभरातील पाच हजार गावांचा समावेश – देवेंद्र फडणवीस

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रमात त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. “50 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र अवर्षणग्रस्त आहे. पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाची गरज आहे. मागे आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवाराची योजना राबवली होती. 20 हजार गावात जलसंधरणाची कामं त्यावेळी झाली. 37 लाख हेक्टर जमीन संचिनाखाली आली. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण सुरू करतोय.

या दुसऱ्या टप्प्यात आपण 5 हजार गावं घेतली आहेत. यावर्षी अलनिनो असणार हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा थेंब थेंब वाचवला लागणार आहे, जलसिंचनाची काम करावी लागणार आहेत. यासाठी पाणी फाऊंडेशन खूप चांगलं काम करत आहे. 40 हजार शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे,ते शेतकऱ्यांना ट्रेनिग देतायत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

पानी फाउंडेशन कामात जर काही महत्त्वाचे असेल तर ज्याप्रकारे ते ट्रेनिंग देत आहेत, म्हणजे ट्रेनिंग घेणारा प्रत्येक शेतकरी केवळ ट्रेनिंग घेतोय असं नसून तो ट्रेनरही होत आहे. म्हणूनच मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना कायम पानी फाऊंडेशनला सोबत घेऊन काम केलं आहे. आताही त्यांच्यासाऱख्या ज्या चांगल्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. असही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची मागणी असते की, आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळावी. त्यासाठी आता आपल्याकडे जेवढे अॅग्रीकल्चरल फीडर आहेत ते सर्व सोलरवर आणण्याचा निर्णय़ आम्ही घेतला आहे. याच वर्षी तीस टक्के फिडर सोलरवर आणण्यासाठी काम हाती घेतल आहे. हे सर्व फिडर सोलरवर आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल. याचा पहिला प्रयोग आपण 2017 साली राळेगणसिद्धीला केला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावी केला होता आणि तो यशस्वीही झाला.