केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असा गौप्यस्फोट कोकणातील आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. ठाकरे गटाचे असलेले आमदार वैभवव नाईक यांनी नारायण राणेंचे मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचा दावा करताना त्यामागचं कारणही सांगितलं आहे. यावेळी वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.
आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले. भाजपला राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असे भाकीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ईडी प्रकरणात विरोधकांना उपदेश देणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनाही वैभव नाईक यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आलेल्या ईडी नोटीसीनंतर पक्ष का बदलला हे वडिलांना विचारावं. त्यांनी असं काय कॉम्प्रमाईज केलं की त्यांची चौकशी थांबली हे त्यांनी जनतेला सांगावं. मग इतरांना उपदेश द्यावेत, अशी टीका वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर केली.
