कसोटीत 1206 दिवसांनी विराटच शतक, 75व्या शतकासह गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

जागतिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 चा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळताना शानदार शतक झळकावलं आहे. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यानं शतक पूर्ण केलं असून त्याआधी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. 1204 दिवसानंतर शतक ठोकणारा कोहली आपल्या डावात आतापर्यंत चांगल्या लयीत दिसला. कोहलीने आपल्या डावात मिचेल स्टार्कविरुद्ध काही ‘क्वालिटी शॉट्स’ मारले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक असून कसोटी क्रिकेटमधील त्याचे 28 वे शतक ठरले. 2019 नंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतक झळकावल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विराटने कसोटीतील 28 व्या शतकासह भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. सुनील गावस्कर यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 कसोटी शतक ठोकली होती. तर विराटने देखील आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने कसोटीतील 8 वे शतक पूर्ण केले. याशतकानंतर विराटने आपल्या गळ्यातील लॉकेटला किस करून आपले शतक साजरे केले.

गेल्या ४ वर्षांपासून विराट कोहली शतक झळकावण्याची वाट पाहत होता . ही प्रतीक्षा आता संपली आहे. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुध्द झालेल्या सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती. ही त्याची शेवटची शतकी खेळी ठरली होती. त्यानंतर ४ वर्ष तो कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नव्हता.