मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतच्या व्हायरल व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधून काढा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा मुद्दा लावून धरला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी सरकारला निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन द्यावे लागणार आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी म्हात्रे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रा दिली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ठाकरे गटाचा आयटी सेल या मागे असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे.
आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. आमदार यामिनी जाधव म्हणाल्या, एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला. हा प्रकार एका आमदाराबरोबर झाला. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओची चौकशी करावी. माझ्यासोबत आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओची चौकशी करावी. माझ्यासोबत काम करणाऱ्या आणि नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत हा प्रकार घडला आहे. व्हिडिओ मॉर्फ झाला आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही, असे कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचे. त्यामुळे तिचे आयुष्य बरबाद होईल. ती विवाहित महिला आहे. या कृत्यामागच्या सूत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
