राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना आझमी यांचा खरपूस समाचार घेतला.
लव जिहाद आणि धर्मांतर याबाबत मी खरी माहिती देत आहे हे अबू आजमी यांना खटकले आहे. त्यामुळे त्यांची तडफड होत आहे त्यामुळे ती माझ्या जवळ आले ,त्यांची पोलखोल होईल याची भीती त्यांना वाटत आहे. परंतु आपल्या हिंदू तरुणीचे आयुष्य उध्वस्त होईल तेव्हा ही जबाबदारी घेतील का? यांच्या हरकतीमुळे अशा लोकांना मदतच होत आहे. हे त्यांना कळत नाही लव्ह जिहाद मुळे हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होईल तेव्हा ते पुढे येतील का ? यांच्यासारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल तर योग्य नाही. अशाप्रकारे भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला.
विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं.
