राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने या अर्जावर तातडीने सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा दिला आहे.ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहे.दरम्यान, हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहे. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहे. गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
