मुंबई : राजकीय पातळीवरील वादाच्या पलीकडे जाऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठाेर हाेत जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चाैकशी करण्याची घाेषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपली पाेरगी आमची पाेरगी आहे. आपण आश्वस्त राहा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना सांगितले.
विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेवर उत्तर देताना फडणवीस बाेलत हाेते. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी पाेटतिडकीने एका अधिकाऱ्यासंदर्भातील विषय मांडला. मी त्यांना आश्वस्त करू इच्छिताे की लाेकप्रतिनिधी म्हणून तुम्ही असाल, तुमची कन्या असेल, तुमचा परिवार असेल त्यांना कुठल्याही धाेक्यामध्ये येऊ दिले जाणार नाही. त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरविली जाईल. कुटुंबावर काेणी टिकाटिप्पणी करत असेल किंवा धमकी देण्याचा प्रयत्न केला असेल तेही सहन केले जाणार नाही. ही केस मी सीआयडीकडे ट्रान्सफर करताे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष अधिकारी नियुक्त करून या केसची स्वतंत्र चाैकशी केली जाईल.
अशा प्रकारच्या काेणत्याही प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बाेलला आहे. त्यांनीही सांगितले आहे की अशा प्रकारच्या धमक्या येऊ देणे मान्य केले जाणार नाही. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. याची गंभीर दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतली.
