पंतप्रधानांना बदनाम करण्याचा आपचा डाव; दिल्लीत भाडोत्री लोकांच्या मदतीने पोस्टर वॉर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव दिल्लीत आं आदमी पक्षाने आखला आहे. त्यासाठी भाडोत्री लोक लावून पोस्टर वार सुरू केले आहे.राजधानीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत सुमारे 2,000 पोस्टर्स काढले. आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून जाणाऱ्या व्हॅनमधून पोलिसांनी 2,000 हून अधिक पोस्टर्स जप्त केले. पोलिसांनी 100 हून अधिक स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत आणि सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आयपी इस्टेटमध्ये एक व्हॅन जप्त केली. अशी पोस्टर्स या व्हॅनमध्ये भरण्यात आली होती. चौकशी केली असता असे आढळून आले की, हे पोस्टर्स आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून आणण्यात आले.

पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, अशी सुमारे 50,000 पोस्टर्स दिल्लीत लावली जाणार होती. त्यासाठी दोन छापखान्यांत काम झाले. त्याचवेळी रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण शहरात हे पोस्टर्स लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकही जमले होते.मोदीविरोधी निषेधाच्या प्रकरणात उत्तर पश्चिम जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच उत्तर जिल्ह्यात सहा, तर पश्चिम जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत.