नवी दिल्ली : अब्रुनुकसानीच्या खटल्यात सूरत न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून राहुल गांधींना सुरत कोर्टाने २ वर्षांची शिक्षा सुनावली, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाने 4 वर्षे जुन्या वक्तव्याबद्दल दोषी ठरवून 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला असला, तरी दोन वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. वास्तविक, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाईल. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरतील.
