सावरकर अपमानावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी, खर्गेंच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली : सावकर अपमानाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडली आहे. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लाकार्जून खर्गे यांनी बाेलावलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.


राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी राहूल गांधी आहे, सावरकर नाही असे वक्तव्य केले हाेते. यापूर्वीही माफीच्या मुद्यावर राहूल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. मालेगाव येथील सभेत बाेलताना उध्दव ठाकरे यांनी सावकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला हाेता. मात्र, त्यानंतर ठाकरे यांच्यावरच काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून टीका सुरू झाली हाेती.


दुसऱ्या बाजुला ठाकरे यांच्यावर सावकरांच्या अपमानावरून टीका सुरू झाली आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करून ते काॅंग्रेससाेबत गेले आहेत. सावकरांचा अपमान हाेत असताना काॅंग्रेसचा निषेध करत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी तर सावकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जाेड्याने मारले हाेते. उध्दव ठाकरे ती हिंमत दाखविणार का? असे सवाल केले जात आहेत. काॅंग्रेसकडून सावरकरांच्या मुद्यावर हाेत असलेली काेंडी पाहता ठाकरे गटाने खर्गे यांच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.