जितेंद्र आव्हाड यांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या की खून; मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. हा सरळ सरळ खून आहे, आत्महत्या नाही असा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. या प्रकरणातील सत्य उघड करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात त्यांचे नाव आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही सुरू होती. अनंत करमुसे प्रकरणाच्यावेळी कदम हे आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते. कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, “हेडकॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम आज सकाळी मृतावस्थेत सापडले! महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या संरक्षणासाठी ते काम करत होते आणि एका प्रकरणात आरोपी होते. एका हाय प्रोफाइल प्रकरणात वैभव कदम साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड ! मी एक्स्पोज करणार.