जगातही ‘मोदीच भारी’ ! ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अव्वल’ ; जगातील 21 नेत्यांना मागे टाकत ठरले अव्वल

सर्वाधिक चांगले काम करणारे राजकारणी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वाधिक पसंत केले आहे. जगातील नेत्यांना मागे टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल ठरले आहेत.

ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये 22 ते 28 मार्च दरम्यान, पंतप्रधान मोदींना जगातील 76 टक्के लोकांनी सर्वोत्कृष्ट राजकारणी म्हणून मान्यता दिली आहे. 100 टक्के लोकांपैकी 5 टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल कोणतेही मत व्यक्त केले नाही, तर 19 टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांसारख्या प्रसिद्ध नेत्यांनाही एका आठवड्यात लोकांचे आवडते राजकारणी म्हणून मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या मान्यता रेटिंगमध्ये 41 टक्के लाईकसह 6 व्या क्रमांकावर आहेत, तर जस्टिन ट्रूडो 39 टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 34 टक्क्यांसह दहाव्या क्रमांकावर आहेत.

नवीन रेटिंग 22-28 मार्च 2023 दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत. मान्यता रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या हलत्या सरासरीवर आधारित आहेत. त्याचा नमुना आकार देशानुसार बदलतो.रेटिंगमध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, इटली, जपान, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या 20 देशांचा समावेश आहे.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्चच्या शेवटच्या एका आठवड्यासाठी हे रेटिंग प्रसिद्ध करण्यात आले आहे.मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांना 61 टक्के लोकांनी एक चांगला राजकारणी म्हणून पसंत केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर, 55 टक्के लोकांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे एक चांगले राजकारणी म्हणून प्रशंसा केली आहे, तर 12 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. 32 टक्के लोकांनी त्यांना चांगला नेता म्हणून नाकारले आहे.