चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे, बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. तर आरसीबीने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. यंदा दोन्ही संघाला चांगली कामगिरी करण्याचा दबाव असू शकतो. कागदावर दोन्ही संघ संतुलित दिसत आहेत..

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर मुंबई इंडियन्स संघ पुढे आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत तब्बल ३२ वेळेस आमने सामने आले आहेत.या ३२ सामन्यांपैकी १९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली आहे. तर केवळ १२ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवता आला आहे.गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग XI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, महिपाल लोमरोर, मायकल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज़ अहमद, डेविड विली, आकाश दीप, सिराज, रीस टॉपले

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अरशद खान, जेसन बेहरेनडॉर्फ