चेन्नई सुपर किंग्ज सोमवारी एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामना करेल. सायंकाळी साडेसातपासून हा सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचे या मोसमात विजयाचे खाते उघडण्याचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर मोसमातील पहिल्या विजयानंतर लखनऊचा उत्साह शिखरावर आहे.
चेन्नई संघ आज आयपीएलमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सकडून पहिल्या सामन्या पराभव झाला. तर लखनौने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. चेन्नईला हा सामना जिंकून आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवायचा आहे तर लखनौला हा सामना जिंकून आपला वेग आणि विजय कायम ठेवायचा आहे.
चेन्नई चार वर्षांनंतर त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. 2019 मध्ये संघाने शेवटच्या वेळी मुंबई विरुद्ध आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर कोरोनामुळे चेपॉकमध्ये स्पर्धा झाली नाही. या बातमीत लखनऊ आणि चेन्नईचे हेड-टू-हेड रेकॉर्ड, दोन्हीचे अव्वल खेळाडू, खेळपट्टीचा अहवाल, हवामानाची स्थिती, संभाव्य प्लेइंग-11 आणि प्रभावशाली खेळाडूंविषयी जाणून घ्या
दोन्ही संघाचे पॉसिबल प्लेइंग-11…
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर आणि राजवर्धन हंगरगेकर.
प्रभावशाली खेळाडू : अजिंक्य रहाणे, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सिमरजित सिंह.
लखनऊ सुपरजायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, निकोलस पूरन, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मार्क वुड, रवी बिश्नोई, आवेश खान आणि कृष्णप्पा गौतम.
प्रभावशाली खेळाडू : जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, यश ठाकूर, करण शर्मा, प्रेरक मांकड.
