ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी संभाजीनगरमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांच्या हजेरीत ही सभा पार पडली. या वज्रमूठ सभेमध्ये भाषणावेळी नेत्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपचे आणि शिंदे गटातील नेते ठाकरे गटातील नेत्यांवर आणि महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहेत
राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना ज्यांची विचारधाराच एक
