छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण हिंदुत्व सोडल्याची उदाहरणे सांगा, घरी बसेल असे आव्हान दिले होते. त्यांना आता टिपू सुलतान गार्डनपासून अजाण स्पर्धेपर्यंतची उदाहरणे दिली जात आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मालाडचे आमदार आणि तत्कालीन मंत्री अस्लम शेख यांनी हिंदुंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव मालाडमधील उद्यानाला देण्याचा घाट घातला होता. मात्र, यावर उद्धव ठाकरे यांनी सोयीस्कररीत्या मौन बाळगले. शिवसेनेचे दक्षिण मुंबईच्या गिरगाव परिसरातील विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लीम समाजातील मुलांसाठी ‘अजान’ पठण स्पर्धा आयोजित केली होती.मुंबईत झालेल्या 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याकुब मेमनच्या कबरीचं मजारमध्ये रूपांतर करण्यात आले. कबरीवर संगमवर दगडाने विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली होती. राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची सूत्रे हाती घेतल्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली.
१६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावात गुरूच्या अंत्यसंस्कारविधीसाठी सुरत येथे जात असलेल्या दोन साधूंची आणि त्यांना घेऊन निघालेल्या गाडीच्या चालकाची २०० ते ३०० च्या जमावाने अत्यंत अमानुषपणे दगडाने ठेचून हत्या केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एव्हढं मोठ प्रकरण होऊन देखील सुरुवातीचे काही दिवस पोलीस स्टेशनमध्ये साधी केस देखील रजिस्टर झाली नव्हती. या हत्याकांडातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाला होता.या हत्याकांडात उद्धव ठाकरेंनी बोटचेपी भूमिका घेतल्याने शिवसैनिकसुद्धा नाराज झाले. या हत्याकांडातील आरोपींची अपुऱ्या पुरांव्यांमुळे जामिनावर सुटका झाली. शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
उद्धव ठाकरे यांनी दीर्घकाळ खेचलेल्या टाळेबंदी मुळे देऊळ बंद ठेऊन सणांवर निर्बंद लादले. हे करत असताना दुसरीकडे मदिरालय किंवा बार सुरु ठेवले. शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये हिंदुहृद्सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘जनाब’ असा उल्लेख केला होता. शिवसेनेने ‘उर्दू भाषा भवन’ उभारण्याची घोषणा केली होती मुंबईतील भायखळा येथे उर्दू भाषा भवन उभारण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूदही मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आली होती.
