स्टार्टअप्समुळे सात वर्षांत नऊ लाख रोजगार; सर्वाधिक ५७ टक्के रोजगार महाराष्ट्रात

भारतामध्ये सुमारे सात वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडियाचे सादरीकरण करण्यात आले. तेव्हापासून, एकूण ८६,७१३ स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास ९ लाख इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती आहे. तसेच देशातील बेरोजगारीचा दर केवळ १ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती आहे.

जानेवारी २०१६ मध्ये तो ८.७ टक्के आणि मार्च २०२३ मध्ये ७.८ टक्के इतका होता. यावरुन हे स्पष्ट होत आहे, की स्टार्टअप्स बेरोजगारीला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहेत, परंतु सरकारी पातळीवर आणखीन काही उपाययोजनांची पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले जात आहे.

जानेवारी २०१६ मध्ये ते ४.६ टक्के होता, जो मार्च २०२३ पर्यंत ५.५ टक्के पर्यंत वाढण्याचे संकेत आहेत. त्याच काळात यूपीमध्ये बेरोजगारीचा दर १५ टक्क्यांवरून ५.५ टक्के, गुजरातमध्ये ३.४ टक्क्यांवरून १,८ टक्के आणि कर्नाटकात ६.४ टक्के वरून घसरला तो २.३ टक्केपर्यंत. ही चार सर्वाधिक स्टार्टअप्स असलेली पहिली पाच राज्ये आहेत.

कृत्रिम बुध्दिमत्तेतील स्टार्टअप

एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) नेदेखील आतापर्यंत १५४० स्टार्टअप सुरू केले आहेत. यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये १३८५ स्टार्टअप्स, रोबोटिक्समधील ४७२ स्टार्टअप पूर्ण झाले असल्याची माहिती आहे.

सर्वाधिक ५७% रोजगार महाराष्ट्रात
{स्टार्टअपमध्ये ५७% रोजगार केवळ ५ राज्यांनी दिले. ते आहेत महाराष्ट्र (५१,३५७), दिल्ली (३०,०८३), कर्नाटक (२४,४८७), गुजरात (२३,८३२) व यूपी (२२,९६९).
{देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक स्टार्टअप कर्नाटकात (९,९०४) आहेत. त्यानंतर दिल्ली (९,५८८), यूपी (७,७१९) व गुजरातचा (५,८७७) क्रमांक लागतो.
{भारताचे ४८% स्टार्टअप्स दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, पुणे व अहमदाबादसारख्या महानगरांत आहेत. मात्र, मजेशीर म्हणजे ५२% मान्यताप्राप्त स्टार्टअप्स नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत.
{हरियाणात बेरोजगारी दर सर्वाधिक २६.८% आहे. २०१६ मध्ये तो १४.८% होता. येथे ४,५११ स्टार्टअपमुळे १३,७१३ लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले.
{राजस्थानात बेरोजगारी दर २६.४%. २०१६ मध्ये ६.७% होता. येथे २,७३१ स्टार्टअपने ११,६४० नोकऱ्या दिल्या.

सर्वाधिक स्टार्टअप आयटीमध्ये
{डीपीआयआयटीने ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ५६ क्षेत्रांमध्ये ८६,७१३ स्टार्टअप्सना मंजुरी दिली आहे. २०१६ मध्ये आकडा ४४५ इतकाच होता.
{सर्वाधिक १०,४१९ स्टार्टअप आयटीत आहेत. आरोग्य (८,०८८) दुसऱ्या, शिक्षण (५,६५०) तिसऱ्या, कृषी (४,२६६) चौथ्या, खाद्य-पेय पदार्थ (४,१८१) पाचव्या स्थानी आहे.
{सर्वाधिक २६,५५८ स्टार्टअप २०२२ मध्येच सुरू झाले. त्यापूर्वी २०२१ व २०२० या दोन वर्षांत ३४,६०१ स्टार्टअपना मान्यता मिळाली होती. यातही २०२१ मध्ये २०,०८० सुरू झाले.
{एआयमध्ये आतापर्यंत १,५४० स्टार्टअप उतरले आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये १,३८५ स्टार्टअप. रोबोटिक्समध्ये ४७२ स्टार्टअप आले.