‘उद्धव ठाकरे महाफडतूस माणूस’ – नारायण राणे

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आज जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हेच खरे महाफडतूस आहेत. देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. पुन्हा जर भाजप नेत्यांवर बोलण्याची हिंमत केली तर आम्ही सोडणार नाही, अशी धमकीवजा इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. ठाकरे गटाचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलतायत, त्यांची हे बोलण्याची लायकी नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांना सुरक्षित करून गेले. आदित्य ठाकरे मात्र उद्धव ठाकरेमुळे सुरक्षित नाही. फडतूस शब्दाचा अर्थ कळतो का? शिवसेना निर्माण करणारा हा नारायण राणे आहे. सगळ्या भाईंना हा फोन करुन मला जीवे मारण्याची धमकी द्यायचाय. मर्द भाषेबद्दल किती वेळा बोलायचं? लायकी तरी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची. अजित पवार यांच्या सगळ करुनही बाहेर आहे त्याच्यामागे कारण बाळासाहेब आहे. परिणाम वाईट होतील फडतुसपणाचा प्रात्यक्षिक करुन दाखवेन अशी धमकी नारायण राणे यांनी दिली.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची आम्ही भरपाई करणार असून आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे पाहुन गप्प होतो, बाळासाहेब तुम्हाला सेफ करुन गेले आहेत. माझं तोंड उघडायला लावू नका, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.