आईमाई वरून शिव्या, शाप देणाऱ्यांचे निर्लज्ज समर्थन करताना राष्ट्रवादीला केतकी चितळे प्रकरणाचा विसर

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आईमाईवरून शिव्या, अळ्या पडून मरण्याचे शाप देणाऱ्याचे राष्ट्रवादीकडून निर्लज्जपणे समर्थन सुरू आहे. रॅपरवर गुन्हा दाखल झाल्यावर निषेध करताना केतकी चितळे प्रकरणात आपण काय केले याचा मात्र विसर पडला आहे.

चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंग व्हायरल केले जात आहे. शिवसेना शिंदे गटावर टीका करताना आई++, भड++ अशा शिव्या देण्यात आल्या आहेत. छक्के असेही म्हटले आहे. याबाबत तक्रार झाल्यावर मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर राज मुंगासेवर भाजप-एकनाथ शिंदे सेना सरकारच्या विरोधात बदनामीकारक रॅप सॉंग गायल्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्याला अटकही केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये त्याचा निषेध करताना त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का? हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे असे म्हटले आहे.५०_खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. महाआघाडीचे सरकार असताना अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली होती केतकीने पोस्टमध्ये ‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक’ असे शब्द वापरले होते. या पोस्टनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आग्रमक भूमिका स्विकारत केतकी विरोधात निदर्शने तसेच आंदोलन सुरू केले आहे. ठाणे पोलिसांनी तिला तीच्या घरातून अटक केली आहे. त्यावेळीही केतकीने कुणाचे नाव घेतले नव्हते याचा सोयीस्कर विसर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे