एखाद्याची किती बदनामी करायची, आम्हीही माणूसच ना? नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवारांचे खडे बोल

पुणे : तुम्ही आधी खात्री करुन घ्या. कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची? आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत, असे खडे बोल अजित पवार यांनी सुनावले. अजित पवार आज सकाळी पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला पोहोचले. काल दुपारी बारामती होस्टेल येथे नियोजित बैठका उरकल्यानंतर अजित पवार फुरसुंगी येथे एका कार्यक्रमाला रवाना झाले होते. मात्र कार्यक्रमाला न जाता हडपसर इथूनच परत निघून सगळे दौरे रद्द केल्याची चर्चा माध्यमांत पसरली होती. पुढील दोन दिवसांचे त्यांचे सर्व दौरेही करण्यात आले होते.

नऊ आमदारांसह अजित पवार गायक अशा प्रकारची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. मात्र आज सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार रांका ज्वेलर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, जागरणं, दौरे जास्त झाली की मला पित्ताचा त्रास व्हायला लागतो. हे आजचं नाही तर नेहमीचं आहे. मला कसतरी व्हायला लागलं, त्यामुळे मी जिजाईवर जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या आणून घेतल्या आणि शांतपणे झोपलो. सकाळपासून कार्यक्रमांना सुरुवात केली. मला इतकं वाईट वाटत होतं. अजित पवार नॉट रिचेबल वगैरे काही पण दाखवत होते. तुम्ही आधी खात्री करुन घ्या, कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची? आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत.


शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका मांडली की त्यावर आम्ही कोणी काही बोलू शकत नाही. तीच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे गौतम अदानी जेपीसी चौकशी प्रकरणावर त्यांची भूमिका अंतिम असेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.