मुंबई : उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून शरद पवार यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेत्या अलका लांबा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. देशाच्या प्रगतीमधील अदानी याचे योगदान नाकारता येणार नाही. आपल्या उद्योजकांचे खच्चीकरण करू नये. असे मत व्यक्त करत शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालाच्या हेतूबाबत शंका व्यक्त केली होती. यावरून कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासमवेतचा फोटो ट्विट करत काही नेते भ्रष्टांना पाठीशी घालत आहेत. राहुल गांधी एकटेच जनतेची लढाई लढत आहेत, असे ट्विट केले होते.
फडणवीस यांनी ट्विट करून अलका लांबा यांना उत्तर दिले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की
राजकारण होत राहील. पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या 35 वर्षांपासूनचे सहकारी, भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांचा अपमान केला आहे.
राहुल गांधी हे भारताची राजकीय संस्कृती विकृत करत आहे
