देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 53,720 वर गेली आहे. देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,753 रुग्ण आढळले आहेत. तर, 27जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,720 वर गेली आहे.
आरोग्य मंत्रालयाने आज (15 एप्रिल 2023) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 10753 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान, कोरोना अपडेटमुळे 27 मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूंपैकी दिल्लीत सहा, महाराष्ट्रात पाच, राजस्थानमध्ये तीन, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर केरळमधील 6 जणांचा समावेश आहे.
राज्यात काल सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांनी एक हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर रुग्णसंख्या वाढत गेली तशी हळूहळू मृतांची संख्याही वाढत आहे. मागील 11 दिवसाची आकडेवारी पाहता राज्यात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाल आहे. मृतांमध्ये बहुतांश सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समवेश आहे. त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
