राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटका विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहे. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर इतर राज्यांमध्ये जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर जे चिन्ह त्यांचे अधिकृत असेल त्या चिन्हांवरती त्यांना निवडणूक लढण्यात काहीशी अडचण येणार होती. मात्र कर्नाटकमधल्या निवडणूका राष्ट्रवादी घड्याळ या अधिकृत चिन्हावर लढणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी म्हणाले, आम्ही कर्नाटक मध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार अहोत. आमचं चिन्ह फ्रिज झालं होतं. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे सध्याचा भाजपचा आमदार दोन दिवसांपूर्वी आला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आह. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारं आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणर आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. 23 वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे.
