राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यमान सरकार मध्ये मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावर भाष्य केले आहे. अजित पवार हे शरद पवार यांना विचारूनच निर्णय घेतील. मात्र, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ते जर सरकारमध्ये येत असतील तर विरोधी पक्षात बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते आमच्या सोबत येतील यापेक्षा गोड बातमी कुठलीच असू शकत नाही असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. याशिवाय अजित पवार हे सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
“अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. विरोधी पक्षात बसून टीका करण्यापेक्षा अजित पवार जर आमच्यासोबत आले तर यापेक्षा गोड बातमी कुठलीच असू शकत नाही. अजित पवार जर सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे.” असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
अजित दादांचा आणि शरदचंद्रजी पवार साहेबांमध्ये पहिले दोघांमध्ये काय सुसंवाद आहे का वाद आहे? हा प्रश्न जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी बोलणं यामध्ये उचित होणार नाही. राजकारणामध्ये परिस्थिती उद्भवत असते आणि अशा परिस्थितीमध्ये कसं राजकारण होतं हे तुम्ही पहिले असेल.
