चीनला मागे टाकत भारत बनला अमेरिकेचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार

अमेरिका हा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांमध्ये मजबूत झाले असतानांच दोन्ही देशांमधील व्यापारात वाढ झाली आहे . वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 2021-22 मधील 119.5 अब्ज डॉलरवरून 2022-23 या आर्थिक वर्षात 7.65 टक्क्यांनी वाढून 128.55 अब्ज डॉलरवर गेला आहे. 2021-22 वर्षात हा व्यापार केवळ 80.51 अब्ज डॉलर इतका होता.

या तुलनेत चीन आता भागीदीरीत दुसऱ्या नंबरवर पोहचला आहे. गेल्या काही वर्षात भारताचे अमेरिकेशी व्यावसायिक संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दोन्ही देशातील व्यापार 7.65 टक्के वाढला आहे. 2020-21 मध्ये हा व्यापार 119 अब्ज डॉलर्सचा झाला होता. 2020-21 वर्षात 80 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष खलिद खान म्हणाले की, “भारत एक विश्वासू व्यापारी भागीदार म्हणून उदयास येत आहे आणि जागतिक कंपन्या त्यांच्या पुरवठ्यासाठी चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आहेत आणि भारतासारख्या इतर देशांमध्ये व्यवसाय विस्तारत आहेत. येत्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात वाढ होत राहील. इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPF) स्थापन करण्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रमात भारत सामील झाला आहे आणि या हालचालीमुळे आर्थिक संबंध वाढण्यास मदत होईल.

अमेरिका अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याशी भारताचा व्यापार वाढत आहे. 2021-22 मध्ये, भारताचा यूएससोबत 32.8 अब्ज डॉलरचा व्यापार वाढला होता. या संबंधीचा डाटा पाहिल्यास असे लक्षात येते की, 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 मध्ये देखील भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार चीन होता. चीनपूर्वी, UAE हा देशाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता. 2021-22 मध्ये 72.9 अब्ज डॉलर्ससह संयुक्त अरब अमिरात भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता. त्यापाठोपाठ सौदी अरेबिया (42.85 अब्ज डॉलर), इराक (34.33 अब्ज डॉलर) आणि सिंगापूर (30 अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.