गेल्या 24 तासांत 7633 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 7 हजार 633 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 61 हजार 233 वर गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळए देशात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 152 वर पोहोचला आहे. दिल्लीत सर्वाधिक चार मृत्यू झाले. हरियाणा, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, केरळमधील चार मृतकांचाही यात समावेळ आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,48,34,851 झाली आहे.

सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे.