आयपीएल 16 व्या मोसमातील 25 वा सामना हा मंगळवारी 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व एडन मार्करम करणार आहे. तर मुंबई इंडियन्सची धुरा ही रोहित शर्मा याच्या खांद्यावर असणार आहे. सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या सुरु हंगामात एकूण 4 सामने खेळले आहेत. हैदराबादचा यापैकी 2 सामन्यात विजय झालाय. एडन मार्करमच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैजराबाद पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्सनेही आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर 2 मॅचमध्ये पराभव झालाय. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स उत्तम रनरेटमुळे गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.
हैदराबादला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर आणि नंतर दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर, हैदराबादने पंजाबविरुद्धया सामना जिंकला. तसेच कोलकाताचाही पराभव केला.मुंबई संघाला पहिल्याच सामन्यात बंगळुरुकडून कडून आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चेन्नईकडूनही पराभव झाला. पण, त्यानंतर हैदराबादने दिल्लीला सहा गडी राखून आणि कोलकाताला पाच गडी राखून पराभूत केलं.
आज होणाऱ्या सामन्यात देखील जोफ्रा आर्चरचं खेळणं कठीण दिसून येत आहे. कारण त्याची दुखापत आणखी वाढली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जोफ्रा आर्चर बांग्लादेश संघाविरुद्ध खेळताना दिसून आला होता.
अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११:
प्रथम फलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ.
प्रथम गोलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर.
