अजित पवारांबाबतच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही – शरद पवार

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांबाबतच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावली नाही. सगळे सहकारी हे पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. असे शरद पवार म्हणाले.

यासोबतच शरद पवार पुढे म्हणाले की, पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवारही याच कामात आहेत. याशिवाय या कामात लक्ष घालण्याची जबाबदारी कुणावरही नाही. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही.