हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
हिंगणा एमआयडीसी भागातील कटेरिया ऍग्रो कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत 20-30 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. आता आग नियंत्रणात आहे. या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.
