मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वाठता, नाराजीमुळे अजित पवार यांच्याकडून भाजपशी हातमिळवणी करण्याची चर्चा सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांनीही पडद्यामागून पुन्हा भाजपची युतीच्या हालचाली सुरू केली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने केला आहे.
उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात भाजपवर टीका करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला काहीही करून भाजपची पुन्हा युती व्हावी यासाठी सतत संपर्क साधत आहेत. पडद्यामागून त्यांच्या हालचाली सुरू आहेत असा दावा भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेले नऊ महिन्यात भाजप सोबत अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही का हे कोणीतरी उद्धव ठाकरेंना विचारावे. जर मी खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरे यांनी यावर बोलावे असे आव्हानही कंबोज यांनी दिले आहे.
शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव मिळाले. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपची पुन्हा जळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
