मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. मुख्यमंत्र्यांची जवळचे नेते समजले जाणारे नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावी पूजा आहे त्यासाठी ते गेले आहेत अशी माहिती म्हस्के यांनी दिली. उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटले आणि त्यांना सांगितलं की आमचा मुख्यमंत्री पदाचा दावा आम्ही मागे घेतोय, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सुट्टीवर नाही शासकीय दौऱ्यावर असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, शिवेंद्र राजे भोसले यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यांच्या गावी पूजा आहे. ती अटेंड करायला ते गेले आहेत. मुख्यमंत्र्यांवर काहीतरी टीका करायची म्हणून अशी टीका करत आहेत. एक दिवस मुख्यमंत्री गावी गेले असतील आणि तिथून पण काम करत असतील आणि म्हणून संजय राऊत टीका करत आहेत. गेल्या अडीच वर्ष जे आधीचे मुख्यमंत्री होते ते नॉट रिचेबल होते. मुख्यमंत्री दालनात कधी गेले नाहीत. कधी मंत्रालयात बसले नाहीत, कोणता दौरा त्यांनी केला नाह, त्यावेळी संजय राऊत का मूग गिळून गप्प बसले होते. त्यावेळी संजय राऊत यांची वाचा कुठे गेली होती त्या मुख्यमंत्र्यांबाबत संजय राऊत काही बोलले होते का? आमचे मुख्यमंत्री एका जागेवर बसणारे नाहीत. रात्रंदिवस सर्वसामान्य लोकांसाठी, महाराष्ट्रातील प्रश्नांची उकल काढण्यासाठी झटणारे आमचे मुख्यमंत्री आहेत.
म्हस्के म्हणाले, संजय राऊत हे कोणत्या मानसिकतेतून बोलतात हे सगळ्यांना माहीत आहे. उपमुख्यमंत्रीही म्हणाले, त्यांची रात्रीची नशा उतरलेली नसते. सामना विकला जात नाही म्हणून ते रात्रभर उरलेल्या सामन्याच्या पुड्या बांधत बसतात, त्या रागातून ते अशी विधानं करतात. संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे.
सकाळी उठायच आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांविरुद्ध बोलायच. सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांना काय माहीत पडला आहे का? की सुप्रीम कोर्टाने यांना सांगितल आहे? असा सवाल राऊत यांनी केला. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशी पद्धत संजय राऊत यांची झाली आहे. तुम्ही बघा थोड्या दिवसांनी ते त्यांचे कपडे फाडून रस्त्यावर धावणार आहेत. भूकंप होणार आहे. राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि शिवसेनेचे जे १५ आमदार आहेत आणि ३ , ४ खासदार आहेत , त्या पैकी मोठ्या संख्येने लोक शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा देणार.
