‘हार्दिक’ की ‘रोहित’ आज कोण मारणार बाजी? नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 35 वा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा सातवा सामना असणार आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत सहा सामने जिंकले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले असून गुजरात चौथ्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्स संघ सहा सामन्यांत तीन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे. आयपीएल लीग जसजशी पुढे जाईल तसतसे या टेबलचे गणित अधिक गुंतागुंतीचे होत जाईल. अशा स्थितीत संघांसमोर विजय हाच एकमेव पर्याय आहे.

हवामानाबद्दल बोलायचे झाले तर पावसामुळे चाहत्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अहमदाबादचे हवामान मंगळवारी स्वच्छ असेल आणि दिवसभर पावसाचा अंदाज नाही. सध्या देशाच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे चाहत्यांना हवामानाची चिंता सतावत आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल. आता हार्दिक पांड्या ब्रिगेड घरच्या मैदानावर आपली कामगिरी दाखवू शकेल की मुंबई पुन्हा विजयी मालिका मिळवेल हे पाहावे लागेल.

आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. हा सामना गेल्या मोसमात झाला होता. ज्यामध्ये मुंबईने बाजी मारली.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पियुष चावला आणि राइली मेरेडिथ.