अजित पवार शरद पवारांना कन्फ्यूज करतात; राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेची जोरदार चर्चा होत आहे. तर दुसरीकडे दबक्या आवाजात अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्याही चर्चा सुरू आहे. याच राजकीय घडामोडीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘अजितदादा हे शरद पवारांना कन्फ्यूज करतात हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे, असे वक्तव्य सोलापुरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांच्या विधानानंतर सुरू झालेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. ‘राजकारणामध्ये लोकांना कन्फ्यूज ठेवणं यात शरद पवारांची हातोटी आहे. मात्र, अजित दादा हे शरद पवारांना कन्फ्यूज करतात हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे’, असे विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या वज्रमुठेला तडे गेले आहेत. त्यामुळं उसण अवसान आणण्याचा हा प्रयत्न आहे. यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये अर्थ उरलेला नाही’.